नाशिक – देशातील व राज्यातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये सक्षमीकरण व रोजगाराजी संधी मिळावी, या उद्देशाने नागरी संरक्षण दर आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षाचा पदव्युत्तर आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अधीक्षक स्मिता शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमामध्ये व्याखानासोबतच प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच सांघिक चर्चासत्र, प्रकल्प कार्य यासोबतच अग्निशमन दल, बॉम्ब शोध पथक, हवामान खाते, रिफायनरी तसेच भातसा नदी या ठिकाणी प्रशिक्षणभेटी आयोजित केल्या जाणार आहेत. राज्य शासनाच्या नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालयात या प्रशिक्षणासाठी रुपये ५९ हजार इतकी फी आकारली जाणार असल्याचेही शिंदे यांनी कळविले आहे. या अभ्यासक्रमसंदर्भात सविस्तर माहिती http://maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी असेही अधीक्षक शिंदे यांनी कळविले आहे.