बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आदिवासी व दुर्गम भागासाठी याचा विचार व्हावा

by India Darpan
सप्टेंबर 22, 2020 | 11:42 am
in इतर
0
IMG 20200920 WA0029

आदिवासी व दुर्गम भागासाठी याचा विचार व्हावा
—
निसर्गसौंदर्याने तसेच मुबलक साधन संपत्तीने समृद्ध असा आदिवासी भाग निसर्गरम्य व सुंदर परिसर आहे. या भागाकडे आजवर फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यासाठी या बाबींचा विचार करता येऊ शकतो
—
– पर्यटन व्यवसायाला खूप असा वाव आहे. परंतु स्वातंत्र्यकाळापासून आजपर्यंत पाहिजे असा विकास झाला नाही. हाकेच्या अंतरावर आपल्या शेजारचे राज्य सापुतारा सारखे चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ उभारू शकते. आपल्या भागात अशी खूपच पर्यटन स्थळे होऊ शकतात. परंतु होत नाही. ही खूपच मोठी शोकांतिका आहे.
– लाथ मारेन तिथे पाणी काढेल, असे आदिवासी समाजबांधव आहेत. मात्र, ते दुसऱ्या तालुक्यात जाऊन मोलमजूरी तसेच दुसऱ्याच्या हाताखाली काम करतात. याच आदिवासी बांधवामधून एखादा जरी उद्योजक निर्माण झाला तरी खुप मोठा बदल घडू शकतो.
– जर शासनाच्या विविध योजनांची गोरगरीब बांधवांना माहिती मिळाली, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले, बँकेने पतपुरवठा केला, शासनाने योग्य असे मार्गदर्शन केले तर आदिवासी बांधव फारच पुढे जाऊ शकतात.
– एखादे क्रीडा संकुल मंजूर झाले असते तर आपले जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहचले असते.
– पावसाचे प्रमाण आपल्या भागात खूप जास्त आहे. परंतु पाणी साठवण्यासाठी छोटे छोटे बंधारे व तलाव निर्माण करणे आवश्यक आहे.
– तसेच मोठे उद्योग तयार होण्यासाठी आपल्याकडे हव्या तशा जमिनीची कमतरता आहे. त्यामुळे आपल्या भागात लघुउद्योग नक्की होऊ शकतात. फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी. उदा.भात प्रक्रिया उद्योग, मोहाची दारु, हस्तकला उद्योग, तेल उद्योग, मत्स्यशेती, फुल शेती, डिंक संकलन, आंबा व काजू प्रक्रिया उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, दूध उद्योग आदी.
– पर्यावरणाची हानी न होता सुद्धा चांगल्या प्रकारे छोटे-छोटे पर्यावरणपूरक उद्योग आपण आपल्या भागात  निर्माण करू शकतो.
– गावातील गरीब महिलांना एकत्र करून बचत गटाच्या माध्यमातून पापड,लोणचे,मसाला,बांबूच्या व सागाच्या वस्तू तयार करणे असे गृह  उद्योग निर्माण करून रोजगार उपलब्ध करून स्वतःला आत्मनिर्भर  बनवू शकतो.
– मनरेगा मार्फत आदिवासी बांधवांना गावाजवळच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पाणी फाउंडेशन सारखे कार्यक्रम आपल्या आदिवासी भागांमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तसेच आदिवासी  बांधवांनी खेड्यामध्ये एकत्रित येऊन गावाच्या विकासासाठी  हातभार लावला पाहिजे.
– गोंडवाना विद्यापीठ सारखे एखादे स्वतंत्र असे विद्यापीठ आपल्या आदिवासी भागांमध्ये होणे गरजेचे आहे.
– आपली स्वतंत्र अशी कला, संस्कृती, परंपरा यांची जपणूक करून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
– आपले बांधव नोकरीनिमित्त पर राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात आहेत त्यांनी एकत्र येऊन होतकरू कष्टाळू, मेहनती, गरीब बांधवांना मदत केली पाहिजे तसेच एकत्र येऊन सेवाभावी संस्था निर्माण केल्या पाहिजेत.
– आपण खरोखरच  वंचीत आहोत की आपल्याला आपल्या समाज बांधवांची प्रगती होऊ नये म्हणून जाणून बुजून कोणी वंचित ठेवले आहे का? एवढे दिवस झाले तरी राजकारण पाणी ,रस्ते, रोजगार, आरोग्य ,शिक्षण इथपर्यंतच  सीमित आहे..
– एखादी योजना आली तर ती आपल्या जवळच्या माणसाला कशी मिळेल यांच्यातच धन्यता मानली जाते.. तसेच  शेवटच्या गोरगरीब आपल्या आदिवासी बांधवांना लाभ मिळतो का? ज्याची ओळख त्याची कामे लवकर होतात, असा अनेकांचा अबु आहे.
ज्या  समस्या, अडचणी स्वातंत्र्यकाळात होत्या. त्या कालही होत्या व आजही आहेत. कदाचित भविष्यातही असतील का? आपण सर्व एकत्र येणार आहोत का? आपण आपल्या परिसराचा खरंच विकास कधी करणार आहोत की अजून किती वाट पाहणार आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
– संदिप पुंडलिक वाघमारे, पळशी खुर्द
संपर्क नंबर -7875204206
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्लम्बिंग क्षेत्रात आयपीपीएल; २६ सप्टेंबरपासून सुरुवात

Next Post

नाशिक – आकाश पगार यांच्या विवाहसोहळ्यात अनेक मंत्र्याची हजेरी

India Darpan

Next Post
20200922010834 IMG 1073 scaled

नाशिक - आकाश पगार यांच्या विवाहसोहळ्यात अनेक मंत्र्याची हजेरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011