आदिवासी अर्थव्यवस्थेला परिणामकारकतेने आगेकूच करता यावी, हा यामागील उद्देश आहे. वनधन योजना, ग्रामीण आठवडी बाजार आणि त्यांची कोठारे याच्याशी संबंधित असलेल्या वन रहिवाशांशी संबंधित माहितीचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सध्या TRIFED करत आहे.
डिजिटायझेशनच्या या प्रक्रियेमुळे सर्व आदिवासी समूहांना ओळख मिळेल तसेच जीआयएस तंत्रज्ञानाने त्यांचे स्थान निश्चित होईल. यामुळे या सर्वांना ‘आत्मनिर्भर अभियान’ या पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या मोहिमेंतर्गत आणणे शक्य होईल. या संकटकालीन परिस्थितीत ‘गो ग्लोबल फॉर लोकल’ हा मंत्र स्वीकारत त्याला ‘गो व्होकल फॉर लोकल गो ट्रायबल – मेरा वन, मेरा धन मेरा उद्यम’यामध्ये रुपांतरित करण्यासाठी TRIFED ने त्यांच्या नेहमीच्या मान्यताप्राप्त कार्यक्रमांसोबतच अनेक वेगळ्या वाटेवरचे निर्णय राबवले आहेत. सध्याच्या कठीण काळात त्रासलेल्या आदिवासींसाठी ते रामबाणही ठरत आहे.
महामारी आणि लॉकडाउन यामुळे आदिवासी कलाकारांचा जवळपास १०० कोटी रुपये मूल्यांच्या वस्तूंचा साठा विक्रीशिवाय पडून राहिला होता. हा साठा विकला जावा तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न या परिस्थितीच्या फेऱ्यात सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना मिळावे म्हणून TRIFED ने एक लाखाहून जास्त वस्तू खरेदी केल्या आणि हा विक्री न होऊ शकलेला माल प्राइज इंडिया हे संकेतस्थळ तसेच इतर प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व GeM च्या माध्यमातून (मोठ्या सवलती देत) रिटेल विक्रीचीही योजना आखत आहे. आता जीव आणि जीवन जगवण्याचे साधन या दोहोंमध्ये लोकांचा संघर्ष सुरू आहे. अशावेळी TRIFED योद्धे आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे मोठ्या उत्साहाने वाटचाल करत आहेत.