Last updated on July 31st, 2020 at 04:51 pm
सिन्नर – सिन्नर नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवीत उपनगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले खेचून आणले. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवकांनी उगले यांना मते दिली. त्यामुळे या मतांच्या सहाय्याने उपनगराध्यक्षपद मिळवण्यात उगले यशस्वी ठरले आहेत.