बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता आयपीएलमध्‍ये दिसणार “काटे की टक्‍कर”.

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2020 | 5:58 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SAM 7905 e1603649403756

मनाली देवरे, नाशिक

……

रविवारी चेन्‍नई सुपर किंग्‍ज या तळाच्‍या संघाने मजबुत रॉयल चॅलेजंर्स बंगलोर संघाचा ८ गडी राखुन मोठा विजय मिळविला तर दुस–या सामन्‍यात यंदाच्‍या आयपीएलची “टॉपर” असलेली मुंबई इंडीयन्‍स राजस्‍थान रॉयल्‍सकडून पराभूत झाली. अगदीच तळाला असलेल्‍या या दोन्‍ही संघानी रविवारी विजय मिळविल्‍यानंतर आता सगळी आयपीएल ढवळून निघाली असून आता पुढे काय ॽ तर उर्वरीत सामन्‍यात १०० टक्‍के “काटे की टक्‍कर” अशा वळणावर २०२० ची आयपीएल स्‍पर्धा येवून थांबली आहे.

चेन्‍नईचा विजय

चेन्‍नई सुपर किंग्‍जने, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव करून स्‍वतःसाठी फार काही साध्‍य केले नसले तरी आरसीबी संघाला २ गुणांचा तोटा करून त्‍यांना माञ चांगलेच अडचणीत आणले आहे. चेन्‍नईच्‍या आशा या विजयाने जिवीत ठेवलेल्‍या असल्‍या तरी या सर्व आशाआंकाक्षा अद्याप व्‍हेंटीलेटरवरच आहेत. आरसीबीने प्रथम फलंदाजी करतांना केवळ १४५ धावा केल्‍या. त्‍यात विराट कोहलीची अर्धशतकी खेळी फलंदाजीचा कणा ठरली. संपुर्ण चेन्‍नईचा संघ एकीकडे आणि सॅम करण एकीकडे असे चिञ यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये अनेकदा दिसून आले आहे. या सामन्‍यात अष्‍टपैलू करणची गोलंदाजी चेन्‍नईसाठी तारणहार ठरली. त्‍याने ३ षटकात १९ धावा देवून ३ महत्‍वपुर्ण बळी घेतल्‍याने आरसीबीला मोठी धावसंख्‍या उभारणे शक्‍य झाले नाही. धावांचा पाठलाग करतांना या सामन्‍यात चेन्‍नईचे सगळे धुरंदर फंलदाज या सिझनमध्‍ये जे करू शकले नाही ते नवख्‍या ॠतुराज गायकवाडने करून दाखविले. ५१ चेंडूत नाबाद ६५ धावा करून गायकवाडने चेन्‍नईचा विजय सोप्‍पा केला.

मुंबई इंडीयन्‍स पराभूत

मुंबई इंडीयन्‍सचा राजस्‍थान रॉयल्‍सविरूध्‍दचा सामना देखील आज चांगलाच रंगला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा–या मुंबईचे १९५ धावांचे एक तगडे आव्‍हान राजस्‍थान संघाला दिले होते. मुंबईची अवस्‍था १५ षटकापर्यन्‍त अतिशय वाईट होती. २० षटकात १५० च्‍या आसपास धावा होतील असे वाटत असतांनाच फलंदाजीला आलेल्‍या हार्दीक पांडयाने दिवाळी पुर्वीच आतषबाजी सुरू केली. अवघ्‍या २१ चेंडूत ६० धावा बदडतांना त्‍याने ७ षटकार आणि २ चौकार मारले. तो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरल्‍यानंतर राजस्‍थान रॉयल्‍सने नेहमीप्रमाणे हे आव्‍हान पेलण्‍यासाठी कंबर कसली खरी, परंतु यावेळची राजस्‍थानची रणनिती प्रत्‍यक्षात उतरली. बेन स्‍ट़ोक आणि संजु सॅमसन या जोडीने २ बाद ४४ या धावसंख्‍येवरून राजस्‍थानला थेट विजयासाठी आवश्‍यक असलेल्‍या धावसंख्‍येवर नेवून ठेवले. रॉबीन उथप्‍पाची विकेट मिळवणे यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये आता फार काही कठीण राहीलेले नाही. त्‍याच्‍याबरोबर कर्णधार स्‍टीव्‍ह स्मिथ हे पॅटीन्‍सनचे बळी ठरल्‍यानंतर माञ बेन स्‍ट़ोक आणि संजु सॅमसन या दोघांनी विजयासाठी आवश्‍यक असलेली भागीदारी रचली आणि १६ गुणांची कमाई करून विजयादशमीचा शुभमुहूर्तावर या सिझनच्‍या प्‍ले ऑफमध्‍ये पहिला प्रवेश मिळविण्‍यासाठीचे मुंबई इंडीयन्‍सचे प्रयत्‍न हाणून पाडले.

सोमवारची लढत

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब हा साखळीतला अतिशय महत्‍वाचा सामना शारजामध्‍ये रंगणार आहे. दोन्‍ही संघांचे गुण सारखे असल्‍याने आणि दोन्‍ही संघांसाठी आता “करो वा मरो” अशी स्थिती निर्माण झाल्‍याने सामना रंगतदार होईल यात कोणतीच शंका नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा ठरला दादांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम (बघा व्हिडिओ)

Next Post

चांदवड – प्राध्यापक डॉ.दत्ता शिंपी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

India Darpan

Next Post
IMG 20201025 WA0032 1

चांदवड - प्राध्यापक डॉ.दत्ता शिंपी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011