आजचे राशीभविष्य – सोमवार – २६ ऑक्टोबर २०२०
मेष- परिश्रमाचे फळ मिळेल
वृषभ- वादविवाद टाळा
मिथुन- आर्थिक अंदाज घ्या
कर्क- अचानक प्रवास
सिंह- तब्येतीकडे दुर्लक्ष नको
कन्या- ज्येष्ठांचा सल्ल्याकडे दुर्लक्ष नको
तूळ- किरकोळ शारीरिक त्रास
वृश्चिक- पेशंस वाढवा
धनु – वेळापत्रक विस्कळीत होईल
मकर- अपेक्षांच्या मर्यादा ठेवा
कुंभ- विचारांची व्यापकता वाढवा
मीन – BIRD IN HAND IS BETTER THAN BUSH
…….
शंकासमाधान
प्रश्न पद्मजा – अमृत सिद्धी योग म्हणजे काय?
उत्तर- सर्व शुभ, अशुभ योग हे नक्षत्रांची संबंधित असतात. त्यातील अमृतसिद्धी हा अतिशय शुभ असा सांगितला आहे. तो पुढील प्रकारे येत असतो. रविवारी हस्त नक्षत्र आल्यास सोमवारी मृगनक्षत्र.. मंगळवारी अश्विनी नक्षत्र.. बुधवारी अनुराधा नक्षत्र.. गुरुवारी पुष्य.. शुक्रवारी रेवती.. आणि शनिवारी रोहिणी ही नक्षत्रे असल्यास त्यादिवशी अमृतसिद्धी योग असतो. असा दिवस सर्व शुभ कार्यास अनुकूल सांगितला आहे. परंतु पुढील काही कारणासाठी तो वर्ज्य सांगितला आहे. उदाहरणार्थ मंगळवारी अश्विनी नक्षत्र असता गृहप्रवेश वर्ज.. गुरुवारी पुष्य नक्षत्र असता विवाहास वर्ज. शुक्रवारी रेवती नक्षत्र तसेच शनिवारी रोहिणी नक्षत्र लांब प्रवास वर्ज.
प्रश्न विजया- कपिलाषष्ठी योग म्हणजे काय?
उत्तर- भाद्रपद शुद्ध षष्ठी मंगळवार तसेच रविवारी आल्यास त्याचप्रमाणे त्याच दिवशी व्यतिपात योग असल्यास त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असल्यास कपिलाषष्ठी योग होतो. हा योग देखील अत्यंत दुर्मिळ व शुभ मानला जातो. कालगणनेप्रमाणे साठ वर्षाने हा योग येतो.
गोमती चक्र टीप-
गोमती चक्र हे लक्ष्मीचे प्रतिक मानले गेले आहे. पाच मध्यम आकाराची गोमती चक्र चांदी कवच मध्ये देव्हारात पूजा मध्ये ठेवावेत.
शंख टीप-
डावा शंख देव घराच्या बाहेर ठेवावा तर उजवा म्हणजे दक्षिणावर्ती शंख हा पाणी घालून अडणीवर, जड बाजू दक्षिणेकडे, हलका उत्तरेकडे असा ठेवावा.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..
—
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
—