बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असा आहे मध्य रेल्वेचा ‘प्लॅटिनम’ प्रवास  

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2020 | 10:44 am
in संमिश्र वार्ता
0
madhay railway

मुंबई – जीआयपी रेल्वेची उत्तराधिकारी असलेली मध्य रेल्वे दि. ५.११.२०२० रोजी आपल्या निर्मितीच्या दिवशी प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश करीत आहे.आशियातील  पहिली ट्रेन मुंबई आणि ठाणे दरम्यान शनिवारी, १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३:३५ वाजता धावली. त्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.  बोरी बंदर येथून निघणा-या स्थानकांत लोकांचा जमाव होता. यावेळी किल्ल्याच्या तटबंदीवरून बॅन्ड वाजविण्यात आला, बंदुकीतून गोळ्या उडविण्यात आल्या, सिग्नल झाल्यावर जेव्हा छोटी गाडी तीन इंजिनांसह लाकडी स्थानकातून बाहेर पडली तेव्हा भारतातील रेल्वे युगाची पहाट झाली.

जसजशी वर्षे गेली तसतसे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार झाला. १९०० साली जी.आय.पी. रेल्वे कंपनीमध्ये, भारतीय मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाले. त्याच्या उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेकडे नागपूर तर दक्षिणपूर्वेत रायचूरपर्यंत विस्तार करण्यात आला. अशाप्रकारे, मुंबई येथून भारताच्या जवळजवळ सर्व भागात संपर्क तयार करण्यात आला. जी.आय.पी.चा मायलेज रेल्वेमार्ग २५७५ किमी होता.

दि. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी, निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि धौलपूर राज्य रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना जीआयपी रेल्वेने केली. मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे नेटवर्कने मुंबई शहराच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी अग्रगण्य भूमिका बजावली. भारतातील द्रुतगती परिवहन प्रणालीच्या आगमनाची नोंद देखील ठेवण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेने बरीच प्रगती केली आहे आणि आता त्याचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून ४१५१.९३ किमीचे जाळे आहे. मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरी नेटवर्क हे दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.

ऑक्टोबर १९६६ मध्ये मध्य रेल्वेतील सोलापूर विभाग आणि दक्षिण रेल्वेतील सिकंदराबाद, हुब्बळी, विजयवाडा या विभागांना विलीन करून दक्षिण मध्य रेल्वे  या आणखी एका रेल्वेची स्थापना करण्यात आली. २ ऑक्टोबर १९७७ रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वेमध्ये विलीन झाला आणि दक्षिण रेल्वेतील गुंटकल विभाग दक्षिण मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला. नंतर २००३ मध्ये, आणखी सात झोन तयार करण्यात आले, ज्यात मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि भोपाळ विभागांचा पश्चिम मध्य रेल्वेमध्ये समावेश करण्यात आला आणि मध्य रेल्वेचा झाशी विभाग उत्तर-मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आजच्या तारखेला मध्य रेल्वेचे ५ विभाग आहेत ज्यामध्ये  मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर, पुणे या विभागांत ४६६ स्थानकांचे नेटवर्क आहे. सध्या कोरोना साथीच्या विरोधात लढा देताना मध्य रेल्वे देशाच्या विविध भागात पुरवठा साखळी सुनिश्चित करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक- सातपूरच्या आयटीआयजवळ बर्निंग कारचा थरार ( बघा VDO )

Next Post

नाशकात कोरोनाचे तब्बल ८० टक्के बेड रिकामे

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशकात कोरोनाचे तब्बल ८० टक्के बेड रिकामे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011