मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे वडिल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या हे कोरोनामुक्त होऊन परतले आहेत.