व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंतिम वर्ष परीक्षेबाबत लवकरच बैठक; उदय सामंत यांची माहिती

India Darpan by India Darpan
August 29, 2020 | 9:47 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. सामंत म्हणाले की, सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्य शासन निर्णय घेईल असेही सामंत यांनी संगितले.

सामंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परीक्षेसंदर्भात बाजू मांडण्यात आली होती. तसेच या वर्षापासून उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए (CGPA) पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे हित त्यांची मानसिक स्थिती आणि राज्यातील कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर घेतला होता, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य ,प्राध्यापक, पोलीस व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाने कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा घेईल या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी यावेळी संगितले.


Previous Post

पाणी आरक्षणासाठी आता उपायुक्तांची नियुक्ती

Next Post

विद्यार्थ्यांना दिले स्मार्ट मोबाईल

Next Post

विद्यार्थ्यांना दिले स्मार्ट मोबाईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.