नाशिक – शहरात होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या तंत्रज्ञ यांची दातार जनेटीक्सच्या वतीने सवलतीच्या दरात तपासणी केली जाणार आहे. यासाठी राजन दातार यांची लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगांवकर ,सुभाष पाटिल,डॉ.शंकर बो-हाड़े संजय करंजकर यांनी भेट घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टिने त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी व्हावी यासाठी दातार जनेटीक्सने पुढाकार घेतला आहे. येत्या काळात जे काही तंत्रज्ञ, कामगार संमेलन स्थळी काम करतील त्याची सवलतीच्या दरात तपासणी होणार असल्याची माहीत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. त्याच प्रमाणे ज्या कुणाला या ठिकाणी तपासणी करायाची असेल ती देखील करुन दिली जाणार आहे.त्याच प्रमाणे साहित्य संमेलनास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन राजन दातार यांनी दिले आहे.