अमित जाधव मोनिका भंडारी
गौतमी पाटील प्राजक्ता वारे
निखिलेश मिश्रा
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया(ICMAI) ने केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
नाशिक – कोलकाता येथील द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मैनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडिया ( The Institute of Cost and Management Accountants of India) तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या CMA Intermediate,Final December – 2020 या परीक्षेत नाशिक शाखेच्याच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याहीवर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.
इंटरमेडिएट परिक्षेत नाशिक मध्ये गौतमी पाटील ही पहिली आली असून प्राजक्ता वारे दुसरी तर निखिलेश मिश्रा हा नाशिक विभागातून तिसरा आला आहे. तसेच फायनल परिक्षेत नाशिक विभागातून अमित जाधव प्रथम, मोनिका भंडारी द्वितीय, नोएल सबस्टान हा तिसरा आला आहे.
कॉस्ट अकाउंटेंट्स(Cost Accountants) या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केन्द्र सरकारच्या “दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” या संस्थेच्या वतीने केले जाते. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या वतीने १२वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन(Foundation) ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील इंटरमेडिएट (Intermediate) परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे” जानेवारी २०२१ मध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल २९ मार्च २०२१ रोजी जाहीर झाला. नाशिक विभागातून इंटरमिडीऐट साठी एकुण २८४विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच फायनल साठी एकुण १५५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २६ विद्यार्थी उ्तीर्ण झाले आहे.
दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” च्या नाशिक चॅप्टर चे अध्यक्ष सीएमए(CMA) कैलास शिदे, उपाध्यक्ष सीएमए(CMA) अर्पिता फेगड़े, CMA स्वप्निल खराडे, सचिव सीएमए(CMA) मयुर निकम आणि खजिनदार सीएमए(CMA) दिपक जगताप, सभासद सीएमए(CMA) भुषण पागेरे, सीएमए(CMA) दीपक जोशी, सीएमए(CMA) निखिल पवार, सीएमए(CMA) आरिफ़ मंसूरी
यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
तसेच या सीएमए(CMA) कोर्ससाठी नवीन ऍडमिशन देखील सुरु झाले आहे. अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989 | www.icmai.in | nasik@icmai.in येथे संपर्क करावा असे आवाहनही केले आहे.