बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शंभर वर्षांपासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल! जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक

एका क्लिकवर क्षणात मिळतोय ‘शाळा सोडल्याचा दाखला’

नोव्हेंबर 4, 2022 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20221103 WA0014 e1667489327372

 

कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित ८ जिल्हा परिषद शाळांनी १९०८पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या १५ हजार १७४ विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. ह्या उपक्रमाचे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

या उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शालिनीताई विखे-पाटील यांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून लोकसहभाग उपलब्ध झाला आहे. ‘संवत्सर’ शाळेचे मुख्याध्यापक फैयाजखान पठाण यांच्यासह इतर आठ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे विशेष योगदान लाभले आहे. संवत्सर गावातील शाळेत ६८५२, दशरथवाडी-२४६५, निरगुडेवस्ती-२००८, परजणेवस्ती-११७१, कोद्रेवस्ती-१४१०, बिरोबा चौक- ५२०, औद्योगिक वसाहत-२१०, मनाईवस्ती -४१७ व वाघीनाला -११२ असे एकूण १५१७४ दाखल ऑनलाईन झाले आहेत.

डिजिटल दाखले मिळवितांना शाळेतील एक क्रमांकाच्या रजिस्ट्ररमधील सर्व नोंदी स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये साठवल्या आहेत. त्यानुसार ज्या माजी विद्यार्थ्याला त्याचा दाखला हवा आहे. त्या व्यक्तीचे नाव, आडनाव अथवा शाळा सोडल्याचे वर्ष (माहित असल्यास)या तीनपैकी एक पर्याय टाकल्यास त्या नावाच्या व्यक्तींची नावे समोर येतात. ज्या नावाचा दखला हवा आहे. त्या नावावर क्लिक केल्यास काही क्षणात दाखला तयार होऊन त्याची प्रिंट काढता येते. तसेच दाखल्यातील नोंदी तपासवच्या असतील तर लगेचच रजिस्टरमधील पूर्वीच्या नोंदीचा फोटो समोर येतो. त्यातून दुरूस्तीदेखील करता येते.

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतुक – डॉ. वेणूगोपाल राव यांचे अध्यक्षतेखाली लोकसभेच्या ११ खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने शाळेला भेट दिली आहे. राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. सध्याचे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २३ डिसेंबर, २०२१ रोजी या शाळेला भेटी दिली होती. त्यावेळी त्यांच्याहस्ते काही माजी विद्यार्थ्यांना डिजिटल दाखल्याचे वितरण ही करण्यात आले. त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे.

‘‘शाळा सोडल्याचा दाखला डिजिटलरित्या जतन करून ठेवण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. संवत्सर शाळेला नुकतीच भेट देऊन हा उपक्रम जाणून घेतला आहे. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून जीर्ण अभिलेखे अतिशय अल्प खर्चात जतन करण्यात आले आहेत. यामुळे वेळ व श्रम दोन्हींची बचत होत आहे. जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये ही असा उपक्रम राबविता येणे शक्य आहे.’’
– आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर

ZP School Leaving Certificate Online Pilot Projects

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवर पाहणार ‘हर हर महादेव’ चित्रपट

Next Post

मुंबईकरांनो सावधान! तातडीने भाडेकरुची माहिती द्या, अन्यथा….; पोलिसांनी दिला हा सज्जड दम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Mumbai Police

मुंबईकरांनो सावधान! तातडीने भाडेकरुची माहिती द्या, अन्यथा....; पोलिसांनी दिला हा सज्जड दम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011