शनिवार, जुलै 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेत रोबोटिक्स ॲण्ड एआय स्टुडिओचे उद्घाटन…

by Gautam Sancheti
जुलै 25, 2025 | 8:41 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250725 WA0319

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेत कार्यान्वित केलेल्या रोबोटिक्स ॲण्ड एआय स्टुडिओमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर अशा प्रकारची लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेने राबविलेला सुपर 50 उपक्रम राज्यात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हा परिषद, नाशिक, शिक्षण विभाग, मालेगाव आणि ग्रामपालिका दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत रोबोटिक्स आणि एआय मेकर स्टुडिओचे उद्घाटन मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सरपंच प्रमोद निकम, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, गट शिक्षणाधिकारी नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असते. अशा लॅबमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळू शकतील. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळणार आहे. राज्यात सुपर ५० उपक्रम राबविण्याबरोबरच क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी देण्यात येईल. या लॅबच्या पाहणीसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भेट देतील. त्यामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवरील जबाबदारी वाढली आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, राज्य शासनाने २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य निश्चित केले आहे. शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ही लॅब उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात १३ लॅब आहेत. या लॅबमध्ये 9 प्रकारची दालने आहेत. विशेष करून यात भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन एआय बद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विविध विषय सोडविण्यासाठी या लॅबचा उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थच्या तयारीसाठी रेल्वे योजनांचा घेतला आढावा…१०११ कोटींच्या या पायाभूत सुविधा उभारणार

Next Post

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी….या नेत्यांच्या घेतली भेट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
CM

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी….या नेत्यांच्या घेतली भेट

ताज्या बातम्या

accident 11

अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार जखमी…वेगवेगळया भागात झालेल्या घटना

जुलै 26, 2025
IMG 20250726 WA0385 1

चांदवड तालुक्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात प्रवेश

जुलै 26, 2025
IMG 20250726 WA0376

वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जुलै 26, 2025
crime1

चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

जुलै 26, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी…

जुलै 26, 2025
ECI response 1024x768 1 e1741738630767

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जुलै 26, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011