नाशिक – तब्बल ८ लाखांची लाच घेतल्याप्रकरणात सहभागी असलेला जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दशपुते याचे निलंबन करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी काढले आहेत. दशपुते हा नाशिक तालुक्यातील राजेवाडी शाळेवर प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा वाहन चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला रंगेहाथ सापडले. त्यानंतर येवले आणि दशपुते यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या परागंदा झाल्या होत्या. त्यानंतर त्या एसीबी समोर हजर झाल्या. त्यांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दशपुते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत सीईओ बनसोड यांनी दशपुते याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
हे आदेश असे