नाशिक – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतींची सुनावणी प्रशासकीय कारणास्तव १० जून ऐवजी १३ जून २०२२ रोजी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकरोड यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटाची व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूसना २ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार २ जून २०२२ ते ८ जून २०२२ या कालावधी त सदर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागविण्यात आलेल्या होत्या. सदर हरकती व सूचनांवर होणारी सुनवाणी प्रशासकीय कारणास्तव १० जून ऐवजी १३ जून २०२२ ला होणार असल्याने सुनावणीबाबत झालेल्या या बदलाची हरकतधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे