बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

by Gautam Sancheti
जून 20, 2025 | 2:24 pm
in स्थानिक बातम्या
0
jilha parishad

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यकारी अभियंता श्रीमती शैलजा नलावडे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा परिषदेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात शासकीय अधिका-यांची दिशाभूल करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलजा नलावडे नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंता असताना त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यकारी अभियंता श्रीमती शैलजा नलावडे या नाशिक जिल्हा परिषदेत बांधकाम क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंता असताना त्यांच्या कार्यालयात ४ डिसेंबर २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शासन निर्णय डीटीएस २०२४/०६/प्र.क्र.१२०/पर्यटन-१ चा दि. ८ ऑगस्ट २०२४ या बनावट कागदपत्राद्वारे एक कोटी रूपयांची पर्यटनस्थळ पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवण्यात आले. हा बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तावेज तयार केले व त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबविली.

या खोट्या दस्तऐवजांचा आधार घेत बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदिप अहिरे यांनी बुधवारी रात्री भद्रकाली पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या विरोधात फसवणूक व बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नलावडे यांना केले होते कार्यमुक्त…
जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनमध्ये जानेवारी २०२५ मध्ये बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांचा पदभार काढून दोन कर्मचारी निलंबित केले होते. श्रीमती नलावडे यांनी या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात मॅटमध्ये आव्हान दिले होते. त्याबाबद सुनावणी सुरू असतानाच जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्रीमती नलावडे यांना २० मार्च २०२५ रोजी कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ प्राधिकरणकडे परत पाठवले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० मे रोजी त्यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयात बदली केली आहे.

चुकीच्या पद्धतीने काम
जिल्हा परिषदेत शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.
अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, नाशिक.

—
shaymugale74@gmail.com

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

Next Post

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या

Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
Court Justice Legal 1

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

जुलै 23, 2025
Kia Carens Clavis EV

किया इंडियाची ४९० किमी रेंज देणारी पहिली मेड फॉर इंडिया ७-सीटर ईव्‍ही …बुकिंगला सुरुवात

जुलै 23, 2025
jail11

कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गजाआड…मनसैनिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

जुलै 23, 2025
रोजगार मेळाव्यांनी साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 2

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

जुलै 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011