मुंबई – राज्यातील झेडपीच्या ८५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झाले. आज या निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहे. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून दुस-या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पालघर येथील निवडणुकीत शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित यांचा पराभव झाला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हट्टापायी जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील वणई गटाचा शिवसेनेचा सिटिंग उमेदवार डावलून त्यांनी चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या गटातील शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. तर गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या या धुळे जिल्हा परिषदेच्या लामकानी गटातून विजयी झाल्या आहे. तर वंचित आघाडीने अकोल्यात आपला गड राखला आहे.या निवडणुकीत १४ पैकी सहा जागा वंचितने जिंकल्या आहे. त्यांना एका अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचा आकडा २३ वर गेला आहे.