नाशिक: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि. १७) रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांचा सादरीकरणाव्दारे आढावा होणार आहे. या आढावा बैठकीत माझी वसुंधरा अभियान, जलजीवन मिशन, महा आवास योजना, एकात्मिक बालविकास योजना या प्रमुख विषयांबाबत सादरीकरणाव्दारे आढावा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष बाबींसंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड सादरीकरण करणार आहेत. विभागीय आयुक्तांकडून विभागातील पाचही जिल्हयांमध्ये आढावा बैठकी घेण्यात येत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीमध्ये विभाग व पंचायत समिती स्तरावरील विषयांचाआढावा होणार आहे.