मुंबई – नव्या तंत्रज्ञानाने माणूस स्मार्ट झाला, पण तरीही अजून अनेकांना त्याच्या वापरातील जोखीम लक्षात आलेली नाही. आपण व्हर्च्युअल मिटींग्समध्येही वावरताना पूर्ण काळजी घ्यायची असते. त्यातल्या त्यात कौटुंबिक व खासगी बाबी या मिटींगपासून लांबच ठेवायला हव्या. एका शिक्षकाच्या हातून झालेली चूक मात्र जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या शिक्षकाचा त्याच्या पत्नीसोबतचे प्रणयच झूम मिटींगमध्ये दिसला.
ही घटना आहे वेस्टइंडिजमधील जमैकाची. शाळेच्या शिक्षकांची झूमवर मिटींग सुरू होती. जमैका टिचर्स असोसिएशनचे वार्षित संमेलन झूमवर आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यात एका शिक्षकाचा कॅमेरा सुरू राहिला आणि तो आपल्या पार्टनरसोबत प्रणय करायला लागला. आपण झूमवर दिसतोय, हे त्याला लक्षातच आले नाही. दहाव्या वर्गात शिकविणारा हा शिक्षक अचानक लाईव्ह प्रणय करू लागल्याने सर्वांना धक्का बसला. सुरुवातीला हशा पिकला मात्र नंतर वरीष्ठांनी ही बाब गांभिर्याने घेतली. त्याला मात्र कॅमेरा बंद आहे, असे वाटल्यामुळे लक्षातच आले नाही.
त्याचदरम्यान एक शिक्षक जोरदार ओरडला मात्र त्याला ऐकायलाच गेले नाही. जवळपास दोन मिनीटे हा सर्व प्रकार सुरू राहिला आणि शिक्षकाच्या लक्षातही आले नाही. त्यानंतर मिटींग डिस्कनेक्ट करण्यात आली आणि त्याला मिटींगमधून हटविण्यात आले. ही घटना व्हायरल झाली, पण संबंधित शिक्षकाच्या विरोधात कारवाई झाली की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. महामारीमध्ये शिक्षकांपुढे उभ्या झालेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ही मिटींग आयोजित करण्याच आली होती. त्यात महत्त्वाच्या मुद्यांवर कुणीतरी बोलत असल्याने सर्व लक्ष देऊन ऐकत होते. त्याचवेळी या शिक्षकाचा बेड कॅमेरात दिसू लागला. पुढे जे काही दिसले ते तर अवाक् करणारेच होते. या मिटींगमध्ये पुढे चर्चा झाली नाही. मात्र सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्यामुळे शिक्षकाला नाचक्की सहन करावी लागली.