मुंबई – एखाद्या कंपनीने आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याला मीटिंग सुरू असताना तडकाफडकी काढून टाकले तर काय होईल? सदर कर्मचारी नाराज होईल. परंतु एक नव्हे तर सुमारे 900 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तडकाफडकी झुम मिटींग द्वारेच नोकरीवरून काढले तर त्याचा परिणाम काय होईल? नक्कीच मोठी खळबळ उडेल, खरोखर असा प्रकार घडला आहे.
अमेरिका संलग्न मॉर्टगेज देणारी (गहाणखत) Better.com ही कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत भारतीय वंशाचे विशाल गर्ग. विशाल यांनी झूम कॉलवर त्यांच्या सुमारे 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कंपनी घरमालकांना गृहकर्जासह विविध प्रकारच्या सेवा ऑफर करते. या संदर्भात झालेल्या व्हिडिओ कॉलच्या रेकॉर्डिंगमध्ये विशाल म्हणाले की, जर तुम्ही या कॉलवर असाल, तर तुमचा येथील रोजगार प्रभावीपणे या क्षणापासून संपुष्टात आला आहे.
विशाल पुढे म्हणाले की, कर्मचारी एचआरकडून त्यांच्या फायद्यांचे तपशीलवार ई मेलची अपेक्षा करू शकतात. बाजारातील कार्यक्षमता, कामगिरी आणि उत्पादकता यामुळे कंपनीना हा निर्णय घेतला आहे. माझ्या कारकिर्दीत ही दुसरी वेळ आहे की मी हे करत आहे. मला ते करायचे नाही. हा कॉल झाल्यानंतर विशाल यांना तीव्र वेदना झाल्या. शेवटच्या वेळी मी हे केले म्हमून मी खुप रडलो, असे विशाल यांनी सांगितले आहे.
एका निवेदनात, कंपनीचे सीएफओ केविन रायन म्हणाले की, विशेषत: वर्षाच्या या वेळी काढून टाकणे चुकीचे आहे. तथापि, बॅलन्सशीट आणि कमी झालेले कर्मचारी वर्ग यामुळे आम्हाला तसे करणे भाग पडले आहे. तसेच कोविड-19 महामारीमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे, हा मोठा धक्का आहे. कारण आरोग्याच्या संकटामुळे ते आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी नोकरी गमावल्याने अडचणीत भर पडेल, असे रायन यांनी स्पष्ट केले.