इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जर तुम्ही व्हिडीओ कॉलसाठी बिनदिक्कतपणे झूम अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुढच्या महिन्यापासून काही लॅपटॉपमध्ये झूम अॅप काम करणे बंद करेल. झूम अॅपला ऑगस्ट २०२२ पासून Chromebooks वर अधिकृतपणे सपोर्ट दिला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही अजूनही ते वापरत असल्यास, तुम्हाला लवकरच आणखी मोडेम आणि वापरण्यायोग्य असा दुसरा पर्याय शोधावा लागेल.
वास्तविक Chromebooks Chrome OS चालवतात आणि क्रोम अॅप्सला सपोर्ट करतात. परंतु अलीकडे Google ने त्यांचे लक्ष प्रोग्रेसिव्ह वेब अॅप्सकडे वळवले आहे, कारण ते “प्रथम श्रेणी वापरकर्ता अनुभव” असल्याचे दिसते. 2020 मध्ये पहिल्यांदा जाहीर केलेल्या या धोरणानुसार, Google Chrome OS वर आधारित Chromebooks वरील Chrome अॅप्ससाठी सपोर्ट काढून टाकणार आहे. नवीन अॅप्स यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, तर विद्यमान अॅप्स जून २०२२ पासून Chrome वेब स्टोअरमधून काढून टाकले जातील. विंडोज, मॅक आणि लिनक्सने जून २०२१ मध्ये क्रोम अॅप्सचा सपोर्ट बंद केला. डेव्हलपर त्यांना खाजगीरित्या उपलब्ध करून देणे निवडू शकतात.
अधिकृत सपोर्ट संपल्यानंतरही तुम्ही काही काळ झूम अॅप वापरू शकाल. परंतु तुम्ही Chromebook वापरकर्ता असल्यास, 2021 पासून Chromebooks वर उपलब्ध असलेल्या Zoom वेब अॅपवर स्विच करणे चांगले आहे. झूम अॅप हे व्हिडिओ कॉलसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
zoom app video calling laptop support August 22 Techno Updates