मुंबई- धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होत आहे. या पोटनिवडणुकीत सराकरी सुमारे 63 टक्के मतदान झाले आहे. या पोटनिवडणुकीत कुणाला यश येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी काल मतदान झाले. सर्व ठिकाणी आ- (6 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होत आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63 टक्के मतदान झाले आहे.
मतमोजणीत या तालुक्यांकडे लक्ष (जिल्हा आणि तालुके)
पालघर – पालघर डहाणू तलासरी विक्रमगड वाडा वसई आणि मोखाडा
धुळे – धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा
नंदुरबार – नंदुरबार, शहादा , अक्कलकुवा
अकोला – अकोला, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर , अकोट, तेल्हारा, बाळापूर , पातूर
वाशिम – वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपिर, कारंजा, मानोरा
नागपूर – नागपूर, परशिवनी, रामटेक, सावनेर, हिंगणा, मौदा, कुही, काटोल, नरखेड, कामठी