नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेविका यांना आरोग्य सहाय्यिका पदावर पदोन्नती देण्यात आली.
सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते पदोन्नती आदेश वितरित करण्यात आले. यामध्ये एकूण ६ वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी, तर २५ आरोग्य सेविकांना आरोग्य सहाय्यिका पदावर पदोन्नती मिळाली. समुपदेशनाने ही पदोन्नती प्रक्रिया पार पडल्याने पदोन्नती मिळालेले कर्मचारी व कर्मचारी संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
या प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी अनिल गीते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे व राजेंद्र येवला, वरिष्ठ सहायक ज्योती गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले तर आरोग्य विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दीपक लोणे तसेच सहायक प्रशासन अधिकारी महेश कारवाळ, वरिष्ठ सहायक नंदकुमार पवार आदींनी परिश्रम घेतले.