मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोटा पडदा म्हणजेच टीव्ही वरील अनेक मालिका सध्या गाजत आहेत. विशेषतः सध्याच्या काळात मराठी मालिकांना घराघरात पसंती दिली जात आहे. त्यात झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका यांच्या कथा या कौटुंबिक नात्यांमधील असल्याने त्याला चांगली पसंती मिळते. परंतु त्याचबरोबर अन्य मालिका देखील तितक्याच आवडीने बघितल्या जातात. विशेषतः सध्या सुरू असलेली किचन कल्लाकार ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली परंतु लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या ठिकाणी नवीन मालिका येणार असल्याचे सांगण्यात येते.
झी मराठीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित झाली आहे. यानंतर आता या वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवीन रिअॅलिटी शो सुरु होणार आहेत. याबाबत झी मराठीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेमुळे झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत अनेक बदल दिसत आहेत.
‘किचन कल्लाकार’ या मालिकेत महाराज या भूमिकेत असलेले अभिनेते प्रशांत दामले यांची जागा निर्मिती सावंत सांभाळत आहेत. तर सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा नाटकांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने त्याच्या जागी श्रेया बुगडे अँकरीगकरत आहे. संकर्षण हा ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी लंडनला गेला आहे. त्याच्या प्रमाणेच प्रशांत दामलेदेखील ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकानिमित्त लंडनला रवाना झाले आहेत. इतकेच नव्हे तर ‘किचन कल्लाकार’मधील अनेक कलाकार हे ब्रेक घेत आहे. कलाकारांच्या व्यस्त शेड्युलचा परिणाम कार्यक्रमावर होताना दिसत आहे. यामुळे ‘किचन कल्लाकार’चा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या ऐवजी झी मराठी वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवा रिऍलिटी शो दाखल होत आहे. छोट्या कलाकारांसाठी हा शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकरांची लगबग सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे. यातून निवडलेले लिटिल मास्टर्स आपल्या नृत्याची जादू दाखवून ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’चा सन्मान मिळवणार आहेत.
zee marathi tv show coming soon new serial