मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक दर्जेदार मालिका देणाऱ्या ‘झी मराठी’ वाहिनीने आता प्रेक्षकांसाठी नवीन मालिका आणली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दाते हिची यात महत्त्वाची भूमिका आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांची रजा घेणार असून तिच्या जागी ही मालिका येणार आहे.
या मालिकेत अनिता दाते हिची महत्त्वाची भूमिका आहेच पण त्यासोबत पल्लवी पाटील, वर्षा दांदळे हे कलाकार असतील. ‘जीव लावला की संसारातील प्रत्येक डाव जिंकता येतो, त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट’, या टॅग लाईनसह मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. अनिता दाते ही रमा तर पल्लवी पाटील आनंदी हे पात्र साकारणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1555592705144922113?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
या मालिकेच्या मध्यवर्ती भूमिकेत नवीन अभिनेता आहे. अभिनेता कश्यप परुळेकर हा राघव ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांत विविध भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या मालिकेत तो राघव ही भूमिका साकारतो आहे. त्याचे आनंदीशी लग्न झाल्यानंतरही तो रमाच्या आठवणींमध्ये गुंतला आहे. रमा आणि आनंदी या दोघींच्या या संसाराची गोष्ट म्हणजे ‘नवा गडी, नवं राज्य’.
https://twitter.com/zeemarathi/status/1554403198135242753?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
या मालिकेबद्दल सांगताना कश्यप सांगतो की, झी मराठी सोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. यापूर्वी देखील असा प्रयत्न मी केला होता, पण ते काही जुळून आलं नाही. यावेळी मात्र हा योग जुळून आला, आणि आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी याबाबत फारच उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. राघवची ही भूमिका अनेक पदरी आहे. जसजशी मालिका वेग पकडेल तसे हे पदर उलगडत जातील असे तो सांगतो.
https://twitter.com/zeemarathi/status/1555508924480110592?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
Zee Marathi Tv Serial Nava Gadi Nava Rajya Actor
Entertainment Anita Date Kashyap Parulekar