मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपण एखाद्या प्रेमीयुगुलाच्या नात्याला वडिलांचा तीव्र विरोध असल्याचे पाहतो. नंतर मात्र कालांतराने त्यांचे त्याला संमती मिळते. एका मालिकेत देखील सध्या असेच घडत आहे ती मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’ होय. झी मराठीवरील ही मालिका अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांची आवडती बनली होती. परंतु ही मालिका लवकरच महिनाभर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र त्यापूर्वी तिचा शेवट गोड होणार आहे असे दिसून येते.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. येत्या काही दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आले.
या मालिकेत सध्या दीपू आणि इंद्राच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात येत आहे. या लग्नाच्या सिक्वेन्सनंतर ही मालिका ऑफ एअर केली जाणार आहे. सध्या या मालिकेत इंद्रा हा पुन्हा त्याच्या घरी राहायला गेला आहे, असे दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे दीपूच्या बाबांनी इंद्राला एक संधी दिली असून तो त्याची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसरीकडे कार्तिक आणि सानिका इंद्राला आणखी गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व संकटावर मात करुन इंद्रा आणि दीपूचं लग्न होणार असं मालिकेच्या ट्रॅकवरुन पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या जागी आता नवी मालिका प्रसारित होणार आहे.
‘तू चाल पुढं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होत होती. आता ‘तू चाल पुढं’ ही मालिका ‘मन उडू उडू झालं’ मालिकेची जागा घेणार आहे. त्यामुळे मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
'तू चाल पुढं' तुला गं सखे साथ तुझ्या आत्मविश्वासाची….
गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची…
नवी मालिका 'तू चाल पुढं
१५ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७. ३० वा. #TuChalPudha #ZeeMarathi pic.twitter.com/xN1fbX0zSX— Zee Marathi (@zeemarathi) July 12, 2022
दरम्यान, ‘तू चाल पुढं’ ही मालिका एका गृहिणीची आहे जिची खूप मोठी स्वप्न मोठी आहेत. ही स्वप्न पूर्ण करत असताना येणारे अडथळे पार करत तिला पुढे जायचे आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना घर-संसारात रमलेल्या एका गृहिणीची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मराठी टेलिव्हिजनवर परत येत आहे.
Zee Marathi Tv Popular Serial will now end coming soon new serial
Man Udu Udu Zala Tu Chal Pudha Entertainment