इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झाशीः उत्तर प्रदेशातील झाशी येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. ४७ नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे.
या घटनेची माहिती देताना झाशीचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन मेहर म्हणाले, की महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागाच्या वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आले होते. अचानक आग लागली. ती शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु बहुतांश मुलांना ऑक्सिजन चालू असल्याने आग वेगाने पसरली. पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली.
अपघातानंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आज सकाळी झाशी मेडिकल कॉलेजची पाहणी केली आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.