इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यानच वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
झाकीर हुसेन यांचे तबला वादनाच्या कौशल्याने जगभरात चाहते होते. बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिले आणि तबला वाजवला होता. ते त्यांच्या क्षेत्रातील सर्वात दिग्गज होते. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना २००२ मध्ये पद्म आणि २०२३ मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी लहानपणापासून तबला शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, ज्यांच्याकडून शिक्षण घेऊन झाकीर हुसैन यांनी वयाच्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता.