मुंबई – तरुणांचे सक्षमीकरण आणि भविष्यात नेतृत्व भूमिकेसाठी तरुण विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी एक शैक्षणिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मायगव्ह व्यासपीठ हे शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) सहकार्याने, युवा लेखकांसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेंतर्गत जगभरातील तरुण आणि इच्छुक भारतीय लेखकांच्या सहभागासाठी ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ऑनलाइन स्पर्धा ४ जून २०२१ रोजी सुरू करण्यात आली होती आणि ती ३१ जुलै २०२१ पर्यंत खुली आहे.
अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण ७५ लेखकांची निवड केली जाईल. एनआयटीने स्थापन केलेल्या समितीमार्फत ही निवड केली जाईल. ही स्पर्धा ४ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत चालणार आहे. मार्गदर्शन योजनेंतर्गत नेटके पुस्तक म्हणून विकसित करण्याच्या योग्यतेचा निर्णय घेण्यासाठी स्पर्धकांना ५००० शब्दांचे हस्तलिखित सादर करण्यास सांगितले जाईल. निवडक लेखकांची नावे १५ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर केली जातील. मार्गदर्शनावर आधारित, निवडलेले लेखक नामनिर्देशित मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निवडीसाठी हस्तलिखिते तयार करतील. १५ डिसेंबर २०२१ पर्यंत विजेत्यांच्या नोंदी प्रकाशनासाठी सज्ज ठेवल्या जातील. प्रकाशित पुस्तकांचे उदघाटन १२ जानेवारी २०२२ रोजी युवा दिनी किंवा राष्ट्रीय युवा दिनी होऊ शकते. ही स्पर्धा १ जून २०२१ रोजी ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. भारताबाहेर राहणारे पीआयओ कार्ड (भारतीय वंशाची व्यक्ती) धारक भारतीय नागरिक किंवा भारतीय पासपोर्ट धारक एनआरआय (अनिवासी भारतीय) देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मार्गदर्शक योजनेंतर्गत प्रत्येक लेखकाला दरमहा ५०,००० रुपये यानुसार सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एकत्रित शिष्यवृत्ती देण्यात येईल. स्पर्धा संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने इच्छुकांनी सहभागासाठी, प्रवेशिका दाखल करण्यासाठी, सामान्य प्रश्न, इत्यादीसाठी https://innovateindia.mygov.in/yuva/ or https://t.co/eq86MucRVH येथे भेट देता येईल.