मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत १० पैकी १० जागा जिंकत अभूतपूर्व यश मिळवले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे. या निवडणुकीत युवा सेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडवला आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवले.
या निवडणुकीत ७२०० पैकी ६६८४ मतपत्रिका वैध ठरल्या. युवासेनेने दाहा जागांवर उमेदवार उभे केले होते. तर अभाविचे दहा उमेदवार होते. तर इतर आठ जण या निवडणुकीत उभे होते. त्यामुळे एकुण २८ उमेदवारांमधून १० उमेदवार निवडून गेले.
या निवडणुकीत महिल प्रवर्गातून युवासेनेच्या स्नेहा गवळी, एससी प्रवर्गातून शीतलशेठ देवरुखकर, ओबीसी गटातून मयूर पांचाळ, एसटी प्रवर्गातून धनराज कोहचडे, एनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे हे निवडून गेले. या सर्व उमेदवाराला पाच हजाराहून अधिक मते पडली तर अभाविपच्या उमेदवाराला हजाराच्या आसपास मते पडली. खुल्या प्रवर्गातून प्रदिप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, किसन सावंत, अल्पेश भोईर हे विजयी झाले.