नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्त्याव्यानंतर शिवसैनिकांमध्ये संताप आहे. आज दिवसभर त्याचे पडसादही राज्यभर उमटले. युवा सेनेने या वक्तव्याचा निषेध करत ठिकठिकाणी आंदोलन केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिक युवासेनेचे शहर चिटणीस अभिजीत गवते-पाटील यांनी सांगितले की, आम्ही राणे यांना खेळण्यातील भूंकणारा श्वान व बिस्कीट पोस्टाने पाठवून आमचा संताप व्यक्त केला. राणेंविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही युवासेनेतर्फे केली आहे. पोस्टाने ही भेट पाठवतांना अथर्व सोनवणे, आदित्य आवटी, विशाल जाधव, अजिंक्य कटाळे, चाणक्य भाटिया, पार्थ सुतार व आदी युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित उपस्थितीत होते असेही गवते – पाटील यांनी सांगितले.