नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर युवासेनेचे कार्यकर्तेही संतप्त झाले असून त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयावर आज सकाळी दगडफेक केली. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या दगडफेकीमुळे भाजपही आक्रमक होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीसांनी सुद्दा या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. केंद्रीय मंत्री राणे हे केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अगोदरच संताप होता. त्यामुळे या घटनेचे पडसाद आज उमटले. सकाळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयालाच लक्ष करत ही दगडफेक केली.