नाशिक – भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य अकादमीकडून दिला जाणारा युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नाशिकच्या युवा साहित्यिक प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या पुस्तकास मिळाला आहे. या पुरस्कारामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्राजक्त देशमुख यांना याअगोदर विजय तेंडुलकर पुरस्कार २०१८ (स्व. यशवतरांव चव्हण राज्य वाङ्मय पुरस्कार – महाराष्ट्र शासन) ,महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव- महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट लेखक (प्रथम) २०१७-१८ (व्यावसायिक नाटक विभाग- सांस्कृतिक कार्य संचलनालय), महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव- महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्व) २०१७-१८ (व्यावसायिक नाटक विभाग- सांस्कृतिक कार्य संचलनालय),कमलाकर सारंग पुरस्कार २०१८ ( महाराष्ट्र साहीत्य परिषद) ,तरुण तेजांकित २०१९ (लोकसत्ता) ,डाॅ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार २०१४ (विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर),कमलाकर सारंग स्मृतिचिन्ह ( इंडीयन नॅशनल थिएटर – एकादशावतार),कमलाकर सारंग स्मृतिचिन्ह ( इंडीयन नॅशनल थिएटर – बुद्रुकवाडीचा मारुती बाटला),रंगसंहिता पुरस्कार २०१८ ( अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद बोरिवली शाखा),रंगसंगीत राज्यस्तरीय संगीत एकांकिका स्पर्धा २०१६ – सर्वोत्कृष्ट लेखक (द्व),रंगसंगीत राज्यस्तरीय संगीत एकांकिका स्पर्धा २०१६ – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक(प्रथम),उत्तुंग सर्वोत्कृष्ट लेखन २०१८,उत्तुंग सर्वोत्कृष्ट लेखन २०१९,गो. ब. देवल स्मृति पुरस्कार २०१८(लेखन) ( अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखा), गो. ब. देवल स्मृति पुरस्कार २०१८ (दिग्दर्शन) ( अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखा),झी मराठी नाट्य गौरव २०१८ (सर्वोत्कष्ट लेखक – व्यावसायिक नाटक विभाग),झी मराठी नाट्य गौरव २०१८ (सर्वोत्कष्ट दिग्दर्शक – व्यावसायिक नाटक विभाग),मटा. सन्मान २०१८ (सर्वोत्कष्ट लेखक – व्यावसायिक नाटक विभाग),मटा. सन्मान २०१८ (सर्वोत्कष्ट दिग्दर्शक – व्यावसायिक नाटक विभाग),संस्कृती कलादर्पण २०१८ (सर्वोत्कष्ट दिग्दर्शक – व्यावसायिक नाटक विभाग),देशदूत तेजस पुरस्कार २०१८ ( दै. देशदूत) ,श्याम फडके स्मृती पुरस्कार (लेखन) (स्व. बाळासाहेब ठाकरे करंडक ठाणे) ,पत्रकार गणेश धूरी स्मृती सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार २०१६ ,सर्वोत्कृष्ट लेखक २०१८ ( मृणालताई करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा) असे अनेक पुरस्कारांनी याना सन्मानित केले आहे. आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचे ,विविध क्षेत्रातील व राजकीय पदाधिकारी यांच्या तर्फे अभिनंदन केले जात आहे.