इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी ठाकरे बंधु विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित यांनी जोरदार भाषण केले. या मेळाव्यात एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उध्दव ठाकरे यांनी सांगत युती संदर्भात जाहीर भूमिका मांडली. पण, राज ठाकरे यांनी युती संदर्भात स्पष्टपणे भूमिका जाहीर केली नाही. त्यात आता राज ठाकरे यांनी युती संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेशच मनसैनिकांना दिल्यामुळे संभ्रम वाढला आहे.
यावेळी त्यांनी सर्व पदाधिका-यांना सांगितले की, कोणत्याही पदाधिका-यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे असे आदेशच दिले. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षाच्या युती संदर्भात संभ्रम वाढला आहे. या युती संदर्भात राज ठाकरे यांची निर्णायक भूमिका ठरणार आहे. उध्दव ठाकरे व त्यांचे समर्थक जाहीरपणे युतीच्या बाजूने बोलत आहे. पण, मनसेने आपले पत्ते राखून ठेवले आहे.
तबल्ल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र
विजयी मेळाव्यासाठी मराठी कलाकांरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तबल्ल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र आल्यामुळे शिवसेना भवनाबाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई वरळी डोममध्ये ‘जय जवान गोविंदा पथक’ ७ थर लावून सलामी देण्यात आली आहे. या सोहळ्यात
फक्त दोन खुर्च्या होत्या. त्याच्या मागे महाराष्ट्राचा नकाशा होता. ठाकरे बंधूंचा विराट विजयमेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. आता ही युती होत की नाही असा संभ्रम राज ठाकरे यांनी दिलेल्या या आदेशानंतर झाला आहे.