इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगणात वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) आणि सत्ताधारी पक्ष टीआरएस यांच्यातील संघर्ष वाढत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी दिसून आला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी यांची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेनच्या मदतीने उचलून नेली. विशेष म्हणजे, शर्मिला रेड्डी या कारमध्ये बसलेल्या होत्या. या घटनेनंतर हैदाराबादील वातावरण चांगलेच तापले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना पोलिसांनी गाडी उचलून घेतली. माहितीनुसार वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) प्रमुख शर्मिला रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याविरोधात निदर्शने करण्यासाठी जात होत्या. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने गाडी उचलण्यात आली.
https://twitter.com/ANI/status/1597502890494799872?s=20&t=I5L8DMQ092bXTlsP989Fxw
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला रेड्डी या मुख्यमंत्री निवासस्थानाचा घेराव करण्यासाठी प्रगती भवनात जाण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने शर्मिला रेड्डी यांची गाडी उचलली, ती स्वतःही कारमध्ये होती. शर्मिला रेड्डी यांना सोमाजीगुडा येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना एसआर नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1597499255249580032?s=20&t=Dikx3ESeBdftOO7x3jPQAQ
YSRTP CM Sister Sharmila Reddy Car Towing
Hyderabad Telangana Andhra Pradesh Politics