इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये ‘बेबी बम्प’चे स्वतंत्र फोटो शूट केले जाते. आणि त्याचाही एक सोहोळा असतो, प्रेस्टीज असतं. यावरून काही अभिनेत्रींना युजर्सने ट्रोलदेखील केले आहे. यात काहीच नवीन नाही. नवीन आहे ते हे की, प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी एकाचवेळी गरोदर आहेत. त्यानेच पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यावरून नेटकरी गोंधळात सापडल्याचे चित्र आहे. एकाच वेळी दोन्ही बायका गरोदर कशा? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यासह अरमानला ट्रोल देखील करण्यात आले आहे.
अरमान मलिकला कृतिका मलिक आणि पायल मलिक अशा दोन बायका आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे १.५ मिलियन फॉलवर्स आहेत. अलीकडे, त्याने इंस्टाग्रामवर आपल्या पत्नींचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांचे बेबी बंप दिसत आहेत. दोन्ही पत्नी गरोदर असल्याने त्याच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर केल्यावर त्याच्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “या मुली नेमक्या कोण आहेत ज्या एक पती शेअर करत आहेत?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “एकाच वेळी दोन्ही बायका गरोदर?” तर तिसरा लिहितो, “तुम्ही लोकांनी थोडी तरी शरम ठेवावी,”
अरमानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर नेटकऱ्यानी पायलबद्दल सहानुभूती देखील व्यक्त केली आहे. पायल सोबत अरमान फोटो टाकत नाही, तिला दुय्यम स्थान दिलं जात आहे. सोबत तिचा वापर होत असल्याची कमेंट करत युजर्सने संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, अरमान मलिकने २०११ मध्ये पायल मलिकबरोबर लग्न केले. त्यांना चिरायू मलिक नावाचा मुलगा आहे. सहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर अरमानने २०१८ मध्ये कृतिका मलिकशी लग्न केले, जी अरमानच्या पहिल्या पत्नीची सर्वात चांगली मैत्रीण आहे.
Youtuber Both Wife Pregnant on Same Time Troll