अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
यूट्यूबर भुवन बामला ओळखत नाही, असा व्यक्ती आज शक्यतो सापडणार नाही, इतका तो लोकप्रिय झाला आहे. भुवन बाम हा यूट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. ‘बीबी की वाइन्स’ने प्रसिद्धी मिळवलेल्या भुवनचे यूट्यूबवर २५ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या वेगळ्या आणि फनी कंटेंट व्यतिरिक्त भुवन कॉमेडीसाठीदेखील ओळखला जातो.
भुवनचे बहुतेक व्हिडिओ अॅडल्ट कॉमेडी आणि ड्रामावर आधारित आहेत. जे लोकांना मजेदार आणि मनोरंजक वाटतात. तो स्वत: त्याच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांना वेगळं काहीतरी बघायला मिळावं यासाठी ४ – ५ पात्र साकारतो. त्याची एका महिन्याची कमाई आश्चर्यचकित करणारी आहे. सोशल ब्लेडवर दिलेल्या आकडेवारीनुसार, भुवनचे यूट्यूब पेज दर महिन्याला ११ हजार डॉलर ते १७५ हजार डॉलर आहे. जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार भुवनची वार्षिक कमाई १० कोटींच्या आसपास आहे. त्याचे चॅनल बी+ श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. केवळ भारतातच नाही तर भुवन बामच्या ‘बीबी की वाइन्स’चे परदेशातही हजारो फॅन्स आहेत.
याशिवाय भुवन बाम मिविचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. रिपोर्टनुसार, त्यांना येथून दरवर्षी सुमारे ४ कोटी रुपये मिळतात. यासोबतच तो मिंत्रा या वेबसाइटचादेखील अॅम्बेसेडर आहेत, तेथून त्याला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय, भुवन आर्क्टिक फॉक्स, बेर्डो, लेन्सकार्ट, मिवी, टिसॉट आणि टेस्टी ट्रीट्ससह अनेक ब्रँड्ससोबत जोडला गेला आहे. यूट्यूब व्हिडिओ बनवण्याव्यतिरिक्त, भुवन बाम म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट फिल्म्समध्येदेखील अनेक दिसला आहे. त्याची आणखी एक वेबसिरीज लवकरच येत आहे. यूट्यूबसह फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक प्लॅटफॉर्मवर भुवनचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.