पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube द्वारे नवीन लाइव्ह रिंग वैशिष्ट्य सादर केले गेले आहे. यात लाल रंगाची रिंग असेल, जी YouTube चॅनलच्या आसपास चॅनल लाइव्ह स्ट्रीम करताना दिसेल. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात YouTube वर लाइव्ह स्टीमिंगची संख्या लक्षणीय रीत्या वाढली आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान थेट चॅनेल सहजपणे ओळखले जाऊ शकते. यासाठी युट्युबने लाल रंगाचे लाईव्ह रिंग फीचर आणले आहे, जे हुबेहूब टिकटॉक सारखे असेल, जे चैलच्या प्रोफाइलभोवती एक वलय निर्माण करेल. यातील काही फीचर ट्विटर स्पेसमध्ये देखील देण्यात आले आहेत.
YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी नील मोहन यांनी ट्विट केले की, युजर्सना @Youtube चे लाइव्ह स्ट्रीमिंग चॅनल शोधणे सोपे व्हावे यासाठी YouTube चा प्रयत्न आहे. यासाठी YouTube क्रिएटर्स लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतील, तेव्हा त्यांच्या चॅनलभोवती लाल वर्तुळ तयार केले जाईल, त्यावर क्लिक केल्यावर ते थेट लाइव्ह स्ट्रीमिंगशी जोडले जातील. तसेच इन्स्टाग्राममध्येही असेच फीचर देण्यात आले आहे. ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान प्रोफाइल पिक्चरभोवती एक गोल रिंग तयार होते. कंपनी YouTube शॉर्ट व्हिडीओ, लाईव्ह आणि VOD वर गुंतवणूक करेल. मोहनने घोषणा केली आहे की कंपनी 2022 मध्ये शॉर्ट व्हिडिओ, लाइव्ह व्हिडिओ आणि व्हिडिओ ऑन डिमांड (VOD) मध्ये अधिकाधिक गुंतवणूक करेल. यासोबतच कंपनी कमाईच्या पर्यायावरही काम करेल. तसेच नील मोहन यांनी सांगितले की, यात लाइव्ह हा एक वेगळा विभाग आहे, ज्याने यावर्षी खूप वाढ नोंदवली आहे. जानेवारी 2020 आणि डिसेंबर 2021 मध्ये डेली लाइव्हवॉचची वेळ तीन वेळा वाढवण्यात आली आहे.