नवी दिल्ली – आजकाल आपण सगळेच जण यूट्यूबवर एचडी आणि फुल एचडीच्याऐवजी 4K फॉरमॅटचे व्हिडिओ पाहणे पसंत करतो. कारण 4K फॉरमॅटचे व्हिडिओ खूपच स्पष्ट दिसतात. त्यामुळे व्हिडिओ पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो. अनेक वेळा आपल्याला यूट्यूबवरील व्हिडिओ आवडतात. असे व्हिडिओ डाउनलोड करण्याची तुम्हाला इच्छा असते. पण ते तुम्ही करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला यूट्यूबवरील 4K व्हिडिओ डाउनलोड करण्याची प्रक्रिया सांगणार आहोत. यूट्यूबवरील व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला 4K Video Downloader for desktop हे थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावे लागेल.
व्हिडिओ असा करावा डाउनलोड
सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर यूट्यूबवर जाऊन व्हिडिओचा यूआरएल कॉपी करावे. 4K Video Downloader उघडून यूआरएल पेस्ट करावा. तुम्हाला डाउनलोड व्हिडिओचा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करून व्हिडिओची गुणवत्ता निवडल्यानंतर डाउनलोडवर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ डाउनलोड होईल.
या फिचरवर यूट्यूबचे काम सुरू
आपल्या व्हिडिओ क्रिएटर्ससाठी यूट्यूब एक विशेष फिचर घेऊन येणार आहे. चॅप्टर असे या फिचरचे नाव असेल. हे फिचर आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमवर आधारित आहे. फिचर आल्यानंतर व्हिडिओमध्ये चॅप्टर आपोआप जोडले जातील. या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. सध्या युजर्सना व्हिडिओमध्ये चॅप्टर स्वतःला जोडावे लागतात.
यूट्यूब शॉर्ट्स
गेल्या वर्षी टिक-टॉकला आव्हान देण्यासाठी यूट्यूबने यूट्यूब शॉर्ट फिचर बाजारात आणले होते. यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून युजर्स लहान व्हिडिओ बनवून आपल्या मित्र आणि कुटुंबीयांना शेअर करू शकतात. या अॅपमध्ये युजर्सना गाणे शेअर करण्याची सुविधा मिळेल. त्याशिवाय युजर्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ संपादितही करू शकतात.