शामली (उत्तर प्रदेश) – कुणी एखादी एकटी बाई दिसली की काही टार्गट तरुण मुलांच्या नजरा वखवखलेल्या असतात, वास्तविक कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे हे अत्यंत वाईट लक्षण आहे. परंतु आपल्या देशात सर्वच राज्यांमध्ये विनयभंग आणि बलात्काराची घटना रोजच घडत आहेत. त्याकडे सर्व समाजाचे लक्ष जातेच असे नाही.
मात्र उत्तर प्रदेशात एका तरुणाने महिलेचा विनयभंग केल्यावर त्या महिलेने तर त्या तरुणाला चपलेने सोबत दिलाच, परंतु नंतर तेथील जमावाने देखील त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी चांगलेच तुडवले अशी शिक्षा दिली तर कोणत्याही पुरूषाची कोणत्याच स्त्री कडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशीही चर्चा या घटनेच्या निमिताने सुरू आहे.
शामली गावामध्ये शनिवारी दुपारी बुढाणा रोड येथे राहणारी महिला आपल्या दोन मुलांसह शाळेतून घरी जात होती. व्हीव्ही इंटर कॉलेज रोडवरील पुलाजवळ तरुणाने अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग केला. तेव्हा या महिलेने आरोपीला पकडून त्याच्या चप्पलने बेदम मारहाण केली. यावेळी लोकांची गर्दी जमली. जमावाने आरोपींना लाथा-बुक्क्यांनीही बेदम मारहाण केली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी उपस्थित तागरिकांनी महिलेला आरोपीने धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी पीडितेच्या वतीने आरोपी मनीष याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.