कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर लग्नसराईला चालना मिळाली आहे. त्यातच येवला तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. विशेष म्हणजे, ही लग्न गाठ सोशल मिडियाच्या माध्यमातून जुळले आणि मंदिरात साजरा झाला दिमाखदार लग्न सोहळा. काय आहे तो आणि त्याची का चर्चा होते आहे याची उत्कंठा ताणू न देता लगेच जाणून घेऊ या…
मनमाड येथील एका तृतीयपंथीयाची येवला तालुक्यातील मातुलठाण येथील एका तरुणाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेम संबंधांमध्ये झाले. आणि या दोघांचा कुटुंबांच्या साक्षीने विवाह सोहळा येथून जवळच असलेल्या नागेश्वर मंदिरात संपन्न झाला.
येथील रहिवासी पोपट शिंदे यांचे चिरंजीव हे तृतीयपंथी असून त्यांचे नाव महंत शिवलक्ष्मी श्रीआईसाहेब हे आहे. त्यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी येवला तालुक्यातील मातुलठाण गावचे तरुण संजय झाल्टे यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क झाला. सोशल मीडियावर त्यांची एकमेकाशी घट्ट मैत्री जुळली आणि त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी कुटुंबाची संमती घेतली. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न सोहळा संपन्न झाला. कुटुंबांच्या साक्षीने नागापूर येथील नागेश्वरा मंदिरात झालेल्या या शुभ कार्याला मोजकेच वऱ्हाडी उपस्थित होते.
पाहूया या अनोख्या लग्नाचा हा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!