इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या अत्याधुनिक काळात मोबाईल आणि संगणक क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे. या क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून भारतातील अनेक तरुण संशोधक या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत संशोधन करीत असतात, अशाच एका तरुणाने या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने उल्लेखनीय यश मिळत YouTube चॅनल क्षेत्रात आगळीवेगळी कामगिरी केलेली आहे
अनेकदा टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात होतंय काय घडतंय हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतं. जगभरात कोणते नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत हे कळू शकत नाही. मात्र एक असा युट्युबर आहे ज्यानं या मास्टरकी मिळवली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या वयात त्यानं टेक्नॉलॉजिकल इन्स्पिरेशन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपण यूट्यूब वापरत असाल आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित गोष्टी पाहत असाल तर तुम्ही टेक बर्नरचे नाव नक्कीच ऐकले असेल. टेक बर्नरचे खरे नाव श्लोक श्रीवास्तव आहे. २६वर्षीय श्लोक हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रभाव टाकणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ९३ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. मात्र, त्याची यूट्यूबवर येण्याची कहाणी रंजक आहे.
देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) प्रवेश न मिळाल्याने त्याला आपल्या स्वप्नांकडे जाण्याची प्रेरणा मिळाली, असे तो सांगतो. मुळात सायन्सची आवड असलेल्या श्लोकचे लहानपणापासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. जेईईमध्ये चांगले गुण मिळवून त्याने आयआयटीमध्ये प्रवेश घ्यावा, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. श्लोकचा जन्म १९९५ साली नवी दिल्लीत झाला. एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळे श्लोककडे सर्व गॅजेट्स तर नव्हते. मात्र लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञान आणि मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समध्ये खूप रस होता. पण सुरुवातीला, श्लोकच्या पालकांनी त्याला गॅजेट्स दिले नाहीत कारण त्याने फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती.
दहावीपासूनच श्लोकने व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याने वडिलांचा लॅपटॉपही वापरला.त्या काळात, त्याचे व्हिडिओ योग्य नसल्यामुळे, त्याच्या मित्रांनी त्याला YouTube वर व्हिडीओ टाकू नको म्हणून सल्ला दिला. मात्र श्लोकला व्हिडिओ तयार करण्याची प्रक्रिया आवडली म्हणून त्याने हार मानली नाही आणि व्हिडिओ तयार करणं सुरूच ठेवलं. काही काळानंतर श्लोकला त्याच्या युट्युब चॅनेलसाठी तब्बल 90 डॉलर्स मिळाले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला.
२०१४ मध्ये, श्लोक बीटेक आयटी (माहिती तंत्रज्ञान) चा अभ्यास करण्यासाठी चेन्नईच्या SRM विद्यापीठात दाखल झाला. कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना, त्याने Tech Burner नावाने एक YouTube चॅनेल सुरू केलं. मात्र पहिल्या चार वर्षांत, श्लोक नियमितपणे व्हिडिओ पब्लिश करत नसल्यामुळे टेक बर्नर चॅनेल वेगानं वाढलं नाही. तो त्याच्या YouTube चॅनेलबद्दल गंभीर नसल्यामुळे, तो दर आठवड्याला फक्त एक व्हिडिओ अपलोड करायचा आणि यामुळे त्याचे चॅनल अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. तसंच त्या काळात श्लोककडे व्हिडिओ तयार करण्यासाठी चांगले गॅजेट्स नव्हते. मात्र यानंतर श्लोकनं कधीच मागे वळून बघितलं नाही.
आता ‘Tech Burner’ या नावाने युट्युब चॅनेल चालवणाऱ्या ‘श्लोक श्रीवास्तव’ याच्याबद्दल सर्व तरूणांना माहिती झाली आहे. आता Tech Burner हे युट्युब चॅनेल किंवा श्लोकचे भन्नाट व्हिडीओज सर्वांनी बघितले असतील, स्मार्टफोन असो किंवा ई कॉमर्स वेबसाईट्सवर मिळणारे आगळेवेगळे प्रॉडक्ट्स असो Tech Burner चॅनेलनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. विशेष म्हणजे श्लोकनं फार कमी वयात इतकं यश मिळवलं आहे. प्रॉडक्ट कोणतंही असो त्याबद्दलचे Review देण्याची पद्धत नागरिकांना वेगळी वाटते म्हणून Tech Burner चे लाखोंमध्ये स्बस्क्राइबर आहेत.
अभियांत्रिकी संपेपर्यंत, श्लोकला एका डिझाईन कंपनीत ८ लाख रुपये वार्षिक पॅकेजसह चांगली नोकरी ऑफर करण्यात आली. पण त्याने ती नोकरी नाकारली आणि YouTube वर पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात, श्लोकचे Tech Burner वर फक्त २ हजार सदस्य होते पण त्याला त्याच्या चॅनलच्या वाढीबद्दल खूप विश्वास होता. पहिल्या चार वर्षांत टेक बर्नरची वाढ प्रभावी नव्हती. पण एकदा श्लोकचे १० हजार सबस्क्राइबर्स झाले आणि त्याचं चॅनल झपाट्याने वाढलं.
आता, श्लोककडे २० कर्मचाऱ्यांची एक भरीव टीम आहे जो त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तसंच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. त्यामुळे श्लोक सारखं आपणही Tech चॅनेल सुरु करावं असं अनेक तरुणांना वाटतं पण त्यामागे श्लोकने केलेली इतके वर्षांची मेहनत आहे. दरम्यान, श्लोकचे व्हिडिओ येताच व्हायरल होतात आणि यूट्यूबवर ट्रेंड होत आहेत. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 93 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तसेच, श्लोक यूट्यूबच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहे.
Youth Success Story YouTube Channel Technology
Startup