इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि तरुणांना कामाला प्रोत्साहनही देत असतात. आनंद महिंद्रा यांनी काल त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बॅटरीवर चालणारी जीप दिसत असून, त्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरज नाही. जुगाड करून ही जीप संबंधित तामिळनाडूच्या गौतम नावाच्या तरुणाने घरी बनवली आहे.
गौतमने आनंद महिंद्रा यांना व्हीडिओमध्ये टॅग करून त्यांच्यासोबत हा व्हीडिओ शेअर केला आहे. व्हिडिओद्वारे त्याने महिंद्रा ग्रुपच्या चेअरमनला नोकरी देण्याची विनंती केली होती. यावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले असून महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी आर वेलुस्वामी यांना या तरुणाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. यासह आनंद महिंद्रा यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांना विश्वास आहे की भारत येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रेसर असेल.
गौतमने त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की जीप अशा प्रकारे बनवली आहे की तिचे पुढील आणि मागील चाके स्वतंत्रपणे नियंत्रित केली जाऊ शकतात. त्याने आपल्या इलेक्ट्रिक वाहनात लिथियम बॅटरीचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. ही जीप जंक मटेरियलपासून बनवली आहे. आनंद महिंद्रा यांना ही जीप आवडली.
आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी लिहिले की, ‘हेच कारण आहे की मला विश्वास आहे की भारत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अग्रेसर असेल. मला विश्वास आहे की कार आणि तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या आवडीमुळे आणि गॅरेज ‘टिंकरिंग’ द्वारे त्यांच्या नाविन्यामुळे अमेरिकेने ऑटो वर्चस्व मिळवले. गौतम आणि त्याची टीम खूप पुढे जाऊ शकते. ट्विटला उत्तर देत गौतमने आनंद महिंद्रा यांचे आभार मानले. ही जीप प्रामुख्याने गौतमने कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी तयार केली असल्याचे सांगितले जाते. त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1560913673295908864?s=20&t=x7prqMTEsmX-1fDppMizmQ
Youth Share Video and Demand Job Anand Mahindra Says
Automobile Social Viral Industrialist