इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयुष्य सुकर व्हावे म्हणून अनेक जण विविध प्रकारचे विमा काढत असतात. मात्र, ब्रेकअपमुळे विम्यापोटी २५ हजार मिळाल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. हा आगळावेगळा लाभ मिळविणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रतीक आर्यन असे आहे.
प्रतीक आर्यन याने केलेल्या ट्वीटनुसार, त्याला ब्रेकअपनंतर विमा कंपनीकडून पंचेवीस हजार रुपये मिळाले आहेत. मुख्य म्हणजे गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाल्यामुळे हे पैसे मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, आमचे प्रेमसंबंध सुरू झाले, तेव्हा आम्ही एका जॉइंट खात्यात दर महिन्याला ५०० रुपये जमा केले. एक पॉलिसी बनवली. पॉलिसीमध्ये एक अट होती, जी व्यक्ती रिलेशनशिप तोडेल, त्यावेळी सर्व पैसे दुसऱ्या व्यक्तीला मिळतील.
रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारचा विमा कुठली कंपनी देते? त्याचे नावही प्रतीकने जाहीर केले आहे. हा हार्टब्रेक इन्शुरन्स फंड असल्याच मुलाने सांगितले. रिलेशनशिपमध्ये दुसऱ्या पार्टनरने लॉयल रहाव, हा त्यामागे उद्देश होता. कोणी एकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तर पैसे दुसऱ्या मिळतील अशी अट होती. म्हणजे एका व्यक्तीला जमा केलेल्या सर्व पैशांवर पाणी सोडाव लागणार होते. मुलाने या फंडची माहिती देताच सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय.
ट्वीट व्हायरल
प्रतीक आर्यन याने तीन दिवसांपूर्वी २५ हजार मिळाल्याचे ट्वीट केले. काही तासांतच ते प्रचंड व्हायरल झाले. त्यावर नेटीझन्सने प्रतिक्रिया दिल्या असून बरीच चर्चा रंगली आहे. सध्या हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Prateek_Aaryan/status/1636009507238346753?s=20
Youth Got 25 Thousand Rupees After Breakup Relationship