नाशिक – वालदेवी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या पवन नगर येथील कमलेश सोनवणे या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गावक-यांनी व पोलीस पथकांना शोधाशोध केल्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह सापडला. या तरुणांबरोबर त्याचे पाच सहा मित्र पोहण्यासाठी एकत्र गेले होते. पण, हे सर्व धरणाच्या बाहेर आल्यानंतर त्यांना आपला मित्र कमलेश बाहेर आले नसल्याचे कळाले. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर कमलेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.
कमलेश हा पवननगरमधील गणपती मंदिरामागे राहतो. लॅाकडाऊन सैल झाल्यानंतर अनेक तरुण फिरण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यात हे मित्रही पोहण्याचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले व ही दुर्दैवी घटना घडली. वाडीव-हे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.