मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड पासून जवळच असलेल्या प्रसिध्द अशा अंकाई किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असते. याच किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वानरांची संख्या असली तरी सध्या वानरांची पाण्याची आणि खाण्याची मोठी टंचाई भासत असल्याने ही वानरे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अकाई गावात फिरत असतात. भुकेने व्याकुळ झालेली वानरांची अन्नाची सोय व्हावी म्हणून शिर्डी येथील युवकांच्या ग्रुपने वानरांच्या खाण्यासाठी निधी जमा करत तो किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या मंदीराचे काम पहाणारे लाल बाबा यांच्याकडे जमा केला. यामुळे वानरांच्या खाण्याची सोय त्यामुळे झाली आहे.उन्हाळ्यात किल्ल्यावरील पाण्याच स्त्रोत्र आटून जात असल्याने वानरांच गावात सर्वत्र संचार होत असतो.शिर्डीच्या या तरुणांच्या मदतीने मात्र काही दिवसांसाठी का होईना वानरांच्या खाण्याचा प्रश्न मिटणार आहे.