नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सह्याद्री फार्म्स व टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे ‘समुदाय उद्योजकता कार्यक्रम’ अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया‘ या उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करु ईच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सह्याद्री फार्म्स- टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी तरुणांसाठी मागील तीन वर्षात आपण 700 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील पासून ‘समुदाय उद्योजकता कार्यक्रम’ प्रकल्प टाटा कॅपिटल च्या सहकार्याने राबविण्याचे निश्चित झाले. आणि आज तो प्रकल्प आपण यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, यामध्ये ग्रामीण भागातील एकूण 61 नवद्योजकांना मोफत प्रशिक्षण आणि भांडवल उपलब्ध करून दिले आहे. 61 होतकरू उद्योजकांना टाटा कॅपिटल यांचेकडून 23.5 लक्ष भांडवल उपलब्ध करून दिले आहे.
‘समुदाय उद्योजकता कार्यक्रमाच्या’ माध्यमातून स्वतःच्या व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊन आपला व्यवसाय आराखडा सादर करणे गरजेचे असते. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांची निवड करून मग 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणानंतर परत त्यांचे सादरीकरण पाहून त्यांना भांडवल उपलब्ध केले जाते. जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या 3 बॅचमधील एकूण 61 नवउद्योजक प्रशिक्षण घेऊन स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनामुळे बऱ्याच तरुणांना आपली नोकरी गेल्यामुळे गावी परतावे लागले अशा तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपान, किराणा दुकान, गॅरेज, मत्स्यपालन, ब्युटीपार्लर अशा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत 86984 11288, 92846 51041 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘‘ ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उद्योजकता वाढावी या हेतूने आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तरुणांमधील उद्योजकीय कौशल्यांना वाव मिळावा यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा.‘‘
– विलास शिंदे, सह्याद्री फार्म्स
प्रशिक्षणाची वैशिष्टे :
1) स्थानिक व्यावसायिक संधी नुसार प्रशिक्षण
2) व्यवसायला अनुरूप मार्गदर्शन
3) पात्र प्रशिक्षणार्थिना आर्थिक सहाय्य
4) व्यवसायातील तज्ञांकडून मार्गदर्शन
5) 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण
6) तंत्रज्ञान मार्गदर्शन
Youth 10 Day Residential Training Industrialist
Sahyadri Farm Nashik Skill Development Rural