मुंबई – सध्याच्या संवाद माध्यम युगात कोणताही माणूस मोबाईल शिवाय जिवंत राहू शकेल की नाही? जणू काही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच व्हाट्सअपसह अन्य समाज माध्यमांची तर सर्वच नागरिकांना इतकी सवय झाली आहे की, त्याशिवाय त्यांना जणू काही जगणेच अवघड वाटते. परंतु आता व्हॉट्सअॅप लवकरच काही स्मार्टफोनवर कायमचे बंद करणार आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या पाहिल्या आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. आणि ती आता ती वेगाने जवळ येत आहे. अर्थात अवघे दोन आठवडेच आता शिल्लक राहिले आहेत.
व्हॉट्सअॅप काही आयफोन आणि काही अँड्रॉइड डिव्हाइसवर चॅट अॅप कायमचे लॉक करेल. विशेष म्हणजे, त्यामुळे पर्याय म्हणून मोबाईल वापरकर्त्यांना त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल किंवा नवीन फोन खरेदी करावा लागेल. ग्राहकांना आपला हँडसेट जुना असल्यास अद्ययावत करण्यासाठी एक नवीन खरेदी करणे आवश्यक ठरणार आहे.
एका अहवालानुसार, यामुळे 40 टक्क्यांपेक्षा जास्त विविध स्मार्टफोन मॉडेल प्रभावित होण्याची शक्यता आहे. फोन अपडेटची मुदत 1 नोव्हेंबर आहे, त्यानंतर व्हॉट्सअॅप काही फोनवर काम करणे बंद करेल. अशा परिस्थितीत, ग्राहकांना अँड्रॉइड 4.1 किंवा नवीनतम मॉडेल वापरावे लागेल, तसेच आयफोनला iOS 10 किंवा नंतरचा वापर करावा लागेल. कारण बरेच फोन निरुपयोगी होतील.
अँड्रॉइडच्या बाबतीत असे म्हटले जात आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एस 3 आणि हुआवेई एसेन्ड मेटसह अनेक लोकप्रिय फोन सुध्दा व्हॉट्सअॅपची सुविधा गमावतील. अॅपलच्या बाबतीत देखील आयफोन 4 किंवा पूर्वीचे व्हर्जन व्हॉट्सअॅपचा प्रवेश गमावेल. तसेच तुमचा आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस किंवा आयफोन एसई (2016) कधीही अपडेट केला नसेल, तर तो अपडेट करेपर्यंत व्हॉट्सअॅप प्रवेश गमावेल. याचे कारण ते iOS 9 वर लाँच केले गेले आहेत.
तथापि, आपण तिन्ही मॉडेल्स नवीनतम आवृत्ती iOS 15 वर ऑपडेट करू शकता आणि व्हॉट्सअॅप मध्ये प्रवेश करू शकता. दरम्यान, जीमेल, यूट्यूब आणि गुगल मॅप्ससाठी गुगलने जुन्या अँड्रॉईड फोनवरही असेच प्रकार केले. त्यामुळे कधीकधी असे होते की, iOS किंवा अँड्रॉईडच्या जुन्या आवृत्त्यांवर अॅप्स काम करणे सोपे नसते. तसेच कालबाह्य सॉफ्टवेअर वापरणे देखील एक मोठा सुरक्षा धोका असू शकतो, म्हणून आपण देखील आपला स्मार्टफोन त्वरित ऑपडेट किंवा अपग्रेड करणे अत्यावश्यक आहे.