अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्टायलिश लुकसह एकामागून एक इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमचे मन खूश होईल. भारतातील एका व्यक्तीने असे उपकरण तयार केले आहे, जे काही तासांतच तुमची जुनी किंवा नवीन सायकल इलेक्ट्रिक बाइकमध्ये बदलेल. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गुरसौरभ सिंग यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट या उपकरणात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी स्वारस्य दाखवले आहे. सायकलला मोटारसायकलमध्ये रूपांतरित करणारी ही जगातील पहिली रचना नाही, परंतु डिझाइन खूपच छान आहे, असं त्यांनी म्हणलं आहे. DVECK प्रणाली २५ किमी प्रति तास क्षमतेच्या सायकलला इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये रूपांतरित करू शकते. याबद्दल माहिती देताना आनंद महिंद्रा म्हणाले की, हे कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम डिझाइन आहे. खडबडीत चिखलातही या सायकलवर आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करता येतो. याशिवाय फोन चार्जिंगही आपण करू शकतो.
https://twitter.com/anandmahindra/status/1492388288136560641?s=20&t=8sVdZy3pm5pkB3TGzT5Xbw
असे आहे डिव्हाइस
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. हे उपकरण, इलेक्ट्रीक सायकल रस्ट प्रूफ आहे म्हणजेच त्याला गंज लागणार नाही. ते एअरक्राफ्ट ग्रेड अॅल्युमिनियमचे बनलेले आहे आणि सायकलचे वजनही कमी आहे. USB चार्जिंग पोर्ट व्यतिरिक्त, डिव्हाइसची बॅटरी २० मिनिटात ५० टक्के चार्ज होते. व्यावसायिकदृष्ट्या ही सायकल यशस्वी ठरेल की नाही हे येत्या काळात समजू शकेल. परंतु तरीही मला एक गुंतवणूकदार असल्याचा अभिमान वाटतो, असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हणलं आहे. पुढील गुंतवणुकीसाठी मात्र ही सायकल बनवलेल्या गुरसौरभ सिंगला पाठिबा दिला आहे.