नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिन २०२२ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ,राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) सर्व सहा खंडातील २५ देशांमधील युवा प्रतिनिधींना आमंत्रित करणार आहे.यापैकी अमेरिका , कॅनडा, ब्रिटन , फ्रान्स, जपान, ओमान, संयुक्त अरब अमिरात , ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मॉरिशस, मोजाम्बिक, नायजेरिया आणि सेशल्स या १५ देशांमधून प्रथमच युवा प्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल.
७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘ आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून १५-२९,जानेवारी २०२२ या कालावधीत हे युवा प्रतिनिधी भारतात असतील. बांगलादेश, नेपाळ, भूतान, रशिया, कझाकस्तान, सिंगापूर, किर्गिझ प्रजासत्ताक, श्रीलंका, मालदीव आणि व्हिएतनाम या विद्यमान १० देशांव्यतिरिक्त या १५ देशांसमवेत राष्ट्रीय छात्र सेनेचा यूथ एक्सचेंज कार्यक्रम चालू आहे.
या २५ देशांमधील राष्ट्रीय छात्र सेना / समकक्ष / युवा संघटनांच्या अंदाजे ३०० छात्रांना एकत्रितपणे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल.भारतभेटीचा एक भाग म्हणून, २५ देशांपैकी प्रत्येक देशाच्या पर्यवेक्षकांसह दहा कॅडेट्स / युवा , प्रजासत्ताक दिन उत्सवाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतील. ते प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमात भाग घेतील.
राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर हा एनसीसीचा सर्वात प्रतिष्ठित वार्षिक कार्यक्रम आहे आणि प्रजासत्ताक दिन संचलन आणि पंतप्रधानांच्या एनसीसी रॅलीत सहभागी तरुणांना अनेक आयुष्यभराचे अनुभव देतो. प्रथमच, एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी परदेशी कॅडेट्स / तरुण एनसीसीतर्फे संबंधित देशांमध्ये आयोजित केलेल्या निवड प्रक्रियेच्या आधारे निवड होण्यासाठीच्या स्पर्धेत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावासांमध्ये संरक्षण संलग्नक तसेच त्या देशातील युवा संघटना यांच्या सहकार्याने त्या देशांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित केली जाईल.
निवड प्रक्रियेसाठी प्रस्तावित विस्तृत कालावधी खालीलप्रमाणे आहे: सारणी
Date
|
Activity
|
July
|
Dissemination of sample quiz paper for the competition by Defence Attaché/Embassy of the concerned country
|
September
|
Quiz competition to be conducted by Defence Attaché/ Embassy of the concerned country with the help of National Cadet Corps/Equivalent Youth organisation
|
October
|
Announcement of results and shortlisting of list of 10 cadets/ youth from participating countries
|
कार्यक्रमात भाग घेणार्या तरुणांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, कोविड -19 चे सर्व शिष्टाचार आणि सुरक्षा पैलू पाळले जातील.भारत, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, भारतातील लोक आणि गेल्या ७५ वर्षात देशाच्या कामगिरीबद्दल इतर देशातील तरुणांमध्ये अधिक जागरूकतेचा प्रसार करणे हा देखील यामागील उद्देश आहे.